You are currently viewing कणकवली नगराध्यक्षांची “ही” मागणी पालकमंत्र्यांनी केली मान्य

कणकवली नगराध्यक्षांची “ही” मागणी पालकमंत्र्यांनी केली मान्य

सूचनांची अंमलबजावणी तात्काळ करा, कारणे नकोत, पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

​कणकवली

कणकवली शहरात कोविडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, कणकवली हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे याठिकाणी तालुक्यातील अनेकजण उपजिल्हा रुग्णालयात येत असतात. या स्थितीत कणकवली शहरातील जनतेला उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर ताटकळत राहावे लागते. त्यामुळे कणकवली शहरासाठी उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत केली. नगराध्यक्ष नलावडे यांच्या मागणीवर आमदार वैभव नाईक यांनी तालुक्यातील अनेक लोक कोविडीचे लसीकरण घेण्यासाठी त्या – त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जात आहेत. त्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कणकवली शहरातील लोकांच्या सोयीसाठी स्वतंत्र काउंटर तयार करावे अशी सूचना केली. त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययोजना करा. व कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन ठिकाणी अशा प्रकारे व्यवस्था करा अशा सूचना दिल्या. या बैठकीत ज्या सूचना दिल्या जातात त्याची तात्काळ अंमलबजावणी दिसायला हवी. याबाबत मला कारणे चालणार नाहीत अशा सक्त सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − twelve =