You are currently viewing नेतर्डे आरोग्य उपकेंद्रात २ एप्रिल रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर

नेतर्डे आरोग्य उपकेंद्रात २ एप्रिल रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर

६० वर्षांवरील नागरिकांची होणार मोफत रक्त तपासणी

बांदा

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था कडशी-मोपा व रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 2 एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नेतर्डे येथे सकाळी 10 ते दुपारी 1.30 या कालावधीत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 31 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत प्राथमिक उपकेंद्र येथे 60 वर्षावरील पुरुष व महिलांचे मोफत रक्त तपासणी होणार आहे.
या आरोग्य शिबिरात हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, लिव्हर व किडनी विकार, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, हाडांचे व संध्या्यांचे आजार, पक्षाघात, वात विकार, मूळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग तसेच अन्य जुनात विकार अशा अनेक रोगांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात येणार आहेत. शिवाय प्रकृतीप्रमाणे आहार विहार व योग संदर्भात माहिती देखील देण्यात येणार आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे.
या शिबिरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांनच्या तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून सेवा देणार आहेत या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिबिर प्रमुख तथा माजी सभापती प्रमोद कामत व आबा धारगळकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =