You are currently viewing मालवणात गाबीत महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन

मालवणात गाबीत महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन

मालवण

मालवण दांडी किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘गाबीत महोत्सव २०२३’ होणार असून यासाठी आज गाबीत महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. येणाऱ्या काळात मालवणात गाबीत समाजाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा मानस यावेळी चंद्रशेखर उपरकर यांनी व्यक्त केला.

मालवण फोवकांडा पिंपळ येथील निवासी संकुलमध्ये गाबीत समाज जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर यांच्या अखत्यारितील गाळ्यात गाबीत महोत्सव कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांच्यासह कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, हरी खोबरेकर, महोत्सव स्थानिक समिती अध्यक्ष अन्वय प्रभू, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मेघा गावकर, सौ.अन्वेशा आचरेकर, सौ.सेजल परब, सौ. पूजा सरकारे, बाबी जोगी, राजा गावकर, सहदेव बापार्डेकर, सौरभ ताम्हणकर, दिलीप घारे, मेघनाद धुरी, भूषण मेतर, विकी चोपडेकर, रुपेश प्रभू, पवनकुमार पराडकर, गंगाराम आडकर व इतर गाबीत समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी चंद्रशेखर उपरकर म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेले हे कार्यालय गाबीत बांधवाना एकत्र येण्यास उपयोगी ठरणार आहे. यापुढे मालवणात गाबीत समाजाचे कार्यालय सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. गाबीत समाजाचा महोत्सव प्रथमच होतं असून यासाठी गावागावात भेटी देऊन आपण गाबीत बांधवांच्या बैठका घेणार आहोत असेही उपरकर म्हणाले. यावेळी महेंद्र पराडकर यांनी महोत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन रविकिरण तोरसकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा