You are currently viewing नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात फळपीक विमा रक्कम देण्याचे लेखी पत्र कृषी अधिक्षकांनी दिल्याने शिवसेनेचे आंदोलन तूर्तास स्थगित

नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात फळपीक विमा रक्कम देण्याचे लेखी पत्र कृषी अधिक्षकांनी दिल्याने शिवसेनेचे आंदोलन तूर्तास स्थगित

*नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात फळपीक विमा रक्कम देण्याचे लेखी पत्र कृषी अधिक्षकांनी दिल्याने शिवसेनेचे आंदोलन तूर्तास स्थगित*

*आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांची माहिती*

*दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार*

आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य सरकारने आपल्या हिस्स्याची रक्कम रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कपंनीकडे जमा केली असून पुढील दोन दिवसांत केंद्र शासनाच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे प्राप्त होईल. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात संबंधित सर्व
पात्र बागायतदारांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाई रक्कम जमा होईल असे लेखी पत्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक विजयकुमार राऊत यांनी देत आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन तसेच जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा समाजाच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी पुढील आठ दिवस पीक विमा आंदोलनाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. कृषी अधीक्षकांनी दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा रक्कम न मिळाल्यास त्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे असे आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आंबा व काजू पीक विम्याची रक्कम दिली जात नसल्याने आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी १ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांनी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी विजयकुमार राउत यांनी आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य सरकारने आपल्या हिस्स्याची रक्कम रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कपंनीकडे जमा केल्याचे सांगितले. पुढील दोन दिवसांत केंद्र शासनाच्या हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे प्राप्त होईल. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात संबंधित सर्व
पात्र बागायतदारांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाई जमा होईल असे लेखी पत्र विजयकुमार राऊत यांनी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन तसेच जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा समाजाच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी पुढील आठ दिवस पीक विमा आंदोलनाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. कृषी अधीक्षकांनी दिलेल्या कालावधीत शेतकऱयांना विमा रक्कम न मिळाल्यास त्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे असे आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी सांगितले.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आल्या असल्याने त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी आणि संबंधित शेतकऱ्यांसमवेत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक ०६ नोव्हेंबर २०२३ दुपारी ३ वाजता राज्याच्या कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेतेखाली त्यांचे दालन क्र. ५०९ पाचवा मजला मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा