You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मालवण तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मालवण तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज महाराष्ट्र दिनी मालवण तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी मालवण तहसीलदार अजय पाटणे, मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष झिरगे, हरी खोबरेकर,महेश कांदळगावकर, मंदार केणी, बाबी जोगी,पंकज सादये, नितीन वाळके, सन्मेश परब, सेजल परब, आदींसह महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =