You are currently viewing स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी अभिवादन कार्यक्रम संपन्न

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी अभिवादन कार्यक्रम संपन्न

प्राधिकरण – (प्रतिनिधी)

‘ने मजशी ने परत मातृभूमिला सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते जयोस्तुते , हे हिंदु नृसिंहो प्रभो शिवाजीराजा, जयदेव जयदेव जय जय शिवराया अशा अनेक तात्यारावांच्या लेखणीतून साकारलेल्या गाण्यांच्या सादरीकरणाने जमलेल्या श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उमटले, उपस्थितांना स्फुर्ती मिळाली. प्राधिकरणातील सावरकर सदन मध्ये झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी अभिवादन कार्यक्रमात संस्कार भारती संगीत विद्यालयाचे सहभागी गायक नादमयी पोरे कुलकर्णी व ज्ञान प्रबोधिनीच्या गुरुकुल मधील बाल कलाकार, तसेच तबला वादक मिलिंद लिंगायात, संवादिनी वादक स्वरेशा पोरे कुलकर्णी, या सर्वांनी मिळून कार्यक्रमास उंची प्राप्त करून दिली.
श्री. पंढरपुरे यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा उत्तमरित्या सांभाळली. सावरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष विश्वानाथनजी नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांनी सर्व सहभागी कलाकारांचे पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन स्वागत केले
कार्यक्रमाची सांगता ‘अखिल हिंदू विजयध्वज हा उभारुया पुन्हा’, या गीताने झाली. या कार्यक्रमास सावरकर प्रेमी, विद्यार्थी, ज्येष्ष्ठ नागरिक , सावरकर मंडळाचे पदाधिकारी, मा. नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, शब्दरंग कला साहित्य कट्टयाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, इतर मान्यवर शिवाय नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र देशपांडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा