You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची युवा कार्यकारणी जाहीर….

सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची युवा कार्यकारणी जाहीर….

अध्यक्षपदी – वैभव कोंडुस्कर तर सचिवपदी विठ्ठल खंडवी यांची निवड

तळेरे

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची स्थापना नुकतीच करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य युवा शारिरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव दिनेश म्हाडगुत यांनी ही नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे.
शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण, राज्य समन्वयक – दत्तात्रय मारकड, युवा संघटनेचे राज्य सचीव दिनेश म्हाडगुत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नूतन कार्यकारणी निवड समितीकडून करण्यात आली आहे. या निवड समितीमध्ये जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडा शिक्षक अच्यूत वणवे-कणकवली, हिराचंद तानवडे-देवगड, तुकाराम देवकर-वैभववाडी,
मारूती माने – कुडाळ, संजय पेंढूरकर – मालवण, अनिल गोवेकर – वेगुर्ले, शैलेश नाईक – सावंतवाडी, सोमनाथ गोंधळी – दोडमार्ग आदी मान्यवरांचा समावेश होता.
या नूतन सिंधुदुर्ग जिल्हा युवा कार्यकारणीचे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगरचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, राजेंद्र कदम, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, राज्य कोअर कमिटी सदस्य बयाजी बुराण, महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण व शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष मयुर ठाकरे, कार्याध्यक्ष सचिन पाटील, व सचिव दिनेश म्हाडगुत यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
नुतन यूवा जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष-वैभव कोंडस्कर (कुडाळ हायस्कूल), कार्याध्यक्ष -विशाल पारकर (सांगेली हायस्कूल), उपाध्यक्ष- सोमनाथ गोंधळी (कुडासे हायस्कूल ता. दोडामार्ग), महेश जाधव (सांडवे हायस्कूल ता. देवगड), राहुल चौगुले (रावराणे काॅलेज वैभववाडी), सचिव-विठ्ठल खंडवी (नरडवे हायस्कूल), खजिनदार-महेंद्र वारंग ( त्रिंबक हायस्कूल ता. मालवण), सहखजिनदार- सुधाकर आडेलकर (रेडी हाय-ता.वेंगुर्ला), सहसचिव – शैलेंद्र सावंत (पब्लिक स्कूल अंबोली), जिल्हा संघटक-शाम वारंग (टोपिवाला हाय-मालवण), संदेश तुळसनकर ( अ.रा. विद्यालय ता.वैभववाडी), नागेश विरकर (भगवती मुणगे हाय-देवगड), महिला जिल्हा संघटक – श्रीम.जयश्री कसालकर (कणकवली काॅलेज), महिला प्रतिनिधी – श्रीम.सुमेधा सावळ(बांदा हाय,ता.सावंतवाडी), संपर्कप्रमुख मिननाथ वारंग (शांतिनिकेतन सावंतवाडी), सहसंपर्कप्रमुख-श्रीकांत हंकारे (जांभवडे हायस्कूल ता. कुडाळ), प्रसिद्धीप्रमुख – सौ.दर्शना मारकड (सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन,कासार्डे ता.कणकवली), महिला सल्लागार-श्रीम.शेवंता नाईक (तायक्वांडो असोसिएशन,देवगड),
सल्लागार- किशोर सोन्सुरकर (वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ले)
सदस्य– संतप्रसाद परब (सरंबळ हायस्कूल ता. कुडाळ), संतोष मेठे (कीर्ती विद्यालय,घोडगेवाडी ता. दोडामार्ग), हेमंत गावडे (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन वेंगुर्ला), निलेश फोंडेकर (नाथ पै.करूळ हायस्कूल ता कणकवली), आकाश पारकर(आदर्श विद्यामंदिर किंजवडे ता. देवगड), शंकर वाघमोडे (उंबर्डे हायस्कूल ता. वैभववाडी) अशी जंम्बो कार्य करणी जाहीर करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 2 =