You are currently viewing राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला

राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला

आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा

मुंबई :

राज्यातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा आशा संपाबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आशांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.

शासनलेखी फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा असे म्हणत आशा वर्कर्स संपावर गेल्या होत्या. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील आशा वर्कर्सकडून देण्यात आला होता. त्यामुळे ऐन कोरोना महामारीच्या काळात आशा वर्कर्सनी पुकारलेल्या या संपामुळे रुग्णांचे हाल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेण्यात आला आहे.

राज्यातील ७२ हजारांहून अधिक आशा वर्कर्स कामावर न जाता घरी बसून हा संप करत होत्या. दरम्यान, राज्यभरातील आशा वर्कर्सनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु होत्या. आशा वर्कर्सचा संप पुकारल्यापासून आशा वर्कर्स संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये तीन बैठका झाल्या. अखेर एक जुलैपासून निश्चित मानधनात वाढ करुन एक हजार रुपये केलं जाणार असल्याची हमी आशा वर्कर्सना देण्यात आल्यामुळे त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =