You are currently viewing आरसा नसता तर….?

आरसा नसता तर….?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

*आरसा नसता तर….?*

*लपवुनी शब्दही बोलतो आरसा*
*कोण त्याच्याकडे पाहतो फारसा…!*

खरंच, कितीही लपवले शब्द तरी चेहरा खरं सांगून जातो… असं म्हणतात ना “चेहरा मनाचा आरसाच असतो…” परंतु चेहऱ्यावरचे भाव समोरचाच ओळखतो…पाहू शकतो… आपणास आपल्या चेहऱ्याला पहायचं असेल तर मात्र आरसा पाहिजेच असतो…! पण हा *”आरसाच नसता तर….?*
किती मजा आली असती ना आरसाच नसता तर…! आरसा म्हणजे आदर्श… प्रामाणिकपणे आरसा आपले कर्तव्य पार पाडत असतो, म्हणून तर आरसा हा आदर्श म्हटला जातो. आपल्या मनात कोणते विचार आहेत?… आणि त्यातून आपल्या चेहऱ्यावर काय बदल झाले? हे दाखविण्याचे काम आरसा प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे आरश्याचे मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
*तुझा आरसा होता आलं*
*तर किती बरं झालं असतं…*
*दिवसातून एकदा तरी तुला*
*डोळेभरून पाहता आलं असतं*
छान कल्पना आहे ना….! प्रियकर सुद्धा प्रेयसीला दिवसातून एकदा पाहण्यासाठी, न्याहाळण्यासाठी तिचा आरसा होऊ पाहतोय… आपल्या प्रेयसीच्या प्रेमात आकंठ बुडालेला प्रियकर आरसा बनून तिचा सहवास घेऊ पाहतो. असा हा आरसा नसता तर…! छे, छे ! ही कल्पना सुद्धा करवत नाही…!
मी तर म्हणतो आरसा नसता तर जीवनात आनंदच उरला नसता…जीवन नीरस झालं असतं… स्त्री नटूनथटून कोणाच्या समोर मुरडली असती…? नट्टापट्टा करायचा…साजशृंगार करायचा… आपल्या लांबसडक कुंतलांची सागरवेणी घालायची…आणि त्या वेणीतील कुंतलांच्या उमटणाऱ्या लाटा तिने पहायच्या कुठे…? दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःला कितीही पहा…आपलं रूपडं आरश्यात पाहण्याची मज्जा दुसरीकडे कुठेच नाही. अधर पाकळ्यांवर लाल लिपस्टिक लावायची…ओठांवर ओठ घासून हळूवार ती पसरवायची…अन् ते स्वतःचंच आरस्पानी सौंदर्य आपण पहायचे कसे…? नाकातील मोत्यांची नथ… कर्णपटलांतील डुलणारी कर्णफुले… गुलाबी गालांवर लावणारी पावडर…नयन पापण्यांवर अलगद लावलेलं काजळ…नाजूक कोरलेल्या भुवया नि गालांवर घुटमळणारी केसांची बटा… अन् तिच्या स्पर्शाने झुकलेल्या नयनांनी गालावर खुलणारी लाली…स्त्री ने पहावी तरी कुठे…?
*”आईना आईना तू बता दे जरा…. क्या मेरे यार को भाये चेहरा मेरा…?”*
असा प्रश्न प्रेयसी आरश्याला विचारून आपल्या मनातील भावना त्याच्यासमोर व्यक्त करून एकटीच गालातल्या गालात हसते…आपल्या पेहरावाला पकडून गिरकी घेते…खुश होते… आरसा नसता तर असा आनंद तिला घेता आला असता का…?
आयुष्याच्या जोडीदाराचे प्रतीक म्हणून कपाळी भांगेत कुंकू भरतात… ती भांग तरी भरता आली असती का…? टिकली लावायला सुद्धा आरसाच पाहतात… सण सोहळ्यासाठी नेसलेली साडी कुणीही कितीही सुंदर म्हणू देत, परंतु जोपर्यंत आपण आरश्यात पाहून ती साडी आपल्या अंगावर किती खुलते आणि त्या आवडत्या रंगाच्या साडीत आपलं सौंदर्य… लावण्यखणी रूप कसं दिसतं हे पाहत नाही तोपर्यंत स्वतःच्या सुंदरतेची स्वतःलाच कल्पना येत नाही…आणि ते खुललेलं सौंदर्य पाहण्यासाठी आरसा तर हवाच…जर आरसाच नसता तर स्वतःचं सौंदर्य… लावण्य देखील पाहण्यापासून… आपल्याच सौंदर्याचा आस्वाद घेण्यापासून स्त्री वंचित राहिली असती. स्वतःला स्वतःच पाहणे… स्वतःचं रूप न्याहाळणे…ही तर माणसांची प्रवृत्ती…! दारावर पाहुणे जरी आले, दारावरची घंटी वाजवली तरी घरची स्त्री आरशासमोर एक मिनिट का होईना उभी राहून आपण नीटनेटके आहोत ना…? याची खात्री करूनच दरवाजा उघडते… एवढी आपल्याला आरशाची सवय झालेली असते.
आपल्याला आपलेच दर्शन देखील प्रसन्न व्हावे ही प्रत्येकाची भावना… म्हणून तर माणसाची आरशासमोर धडपड सुरू असते. आपण कितीही स्वच्छता पाळली, पावडर लावली, केस नीटनेटके विंचरले तरी घराबाहेर पडताना माणूस आरश्यात पाहतोच…! आपण प्रसन्न दिसावे…इतरांनी आपल्याला सुंदर, हँडसम म्हणावे ही प्रत्येक पुरुषाच्या मनातील सुप्त इच्छा असते. अगदी जीवनात मिळालेल्या प्रत्येक यशानंतर चोरून का होईना पुरुष सुद्धा आरशात डोकावतोच…अन् आपल्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव स्वतःच न्याहाळतो…! आरसा नसता तर माणसाला पराक्रम, यशाची प्रेरणाच मिळाली नसती अन् यशाचा, पराक्रमाचा आनंदोत्सव देखील साजरा करता आला नसता. केशकर्तनालयात गेल्यावर किती ते नखरे असतात… सोल्जर कट पाहिजे…कानावर अमिताभ बच्चन सारखे केस ठेवा…धोनी स्टाईल करा…बाजूने बारीक केस कापून त्यात ए, बी, सी, डी कोरा… किती हौशी अन् किती थाट…! आरसा असला तर ही सगळी मजा घेता येईल अन् आरसा नसला तर…! न्हाव्याने केसांचं वाटोळं केलं हे कोणीतरी हसणारे भेटतील तेव्हाच समजलं असतं. रस्त्याने जाताना महाविद्यालयीन युवक तर खिशातील फणी काढून रस्त्यावरील वाहनांच्या आरश्यात पाहून देखील आपले केस विंचरतात… फुशारकी करणाऱ्या कार्ट्याला तर पोरी सुद्धा “आरशात तोंड पाहिलंस का…?” असा खोचक प्रश्न विचारतात…तेव्हा पोरींच्या मागून फिरणाऱ्या टपोरी मुलांना आरश्यात तोंड पाहण्याची नव्हे तर तोंड लपविण्याची वेळ येते… माणसाला आपला चेहरा पुन्हा पुन्हा पहायचा असतो…सौंदर्य जपायचं असतं…ती हौस पूर्ण करण्याचं काम आरसा जळी स्थळी करत असतो. जर तो नसता तर सुंदर आणि कुरूप असा भेदभाव देखील राहिला नसता…! हे ही तितकेच खरे…!

*आरसा खोटं बोलत नाही*
*अन् खरं सुद्धा सांगत नाही*
*आरसा सत्यच दाखवतो*
*खोटी स्तुती मांडत नाही*
आरसा कधीच खोटं बोलत नाही…अन् खोटी स्तुती करत नाही…जे आहे तेच समोर दाखवतो…! आठवतं का तुम्हाला…? लहानपणी एप्रिल मे महिन्यात शहरात जत्रा भरायच्या…त्यात जपानी आरसे महाल असायचा…हौसेने तिकीट काढून आत जायचो अन् त्या आरशात स्वतःचेच चित्रविचित्र चेहरे… कुठे सडसडीत बारीक काठी तर कधी अगडबंब शरीर पहायचो… तेव्हा मात्र आरसे खोटं बोलयचे…! पण किती हसवायचे आरसे…? काही क्षण चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहायचा…आपण जशी एकमेकांची मस्करी करतो अगदी तसेच…आरसे आपली मस्करी करायचे…पण बाहेर पडताना मात्र समोर असणारा आरसा आपलं खरं रूप दाखवून बाहेर पाठवायचा..! खरंच, आरसा नसता तर माणूस स्वतःकडे एवढ्या निर्मळ, निरागस भावनेने पाहू शकला असता का…?
आरसा नसलेले घर कुणाला शोधून तरी सापडेल का…? “मी कोण…?” या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर समाधानकारक कोणी देऊ शकत असेल तर तो आरसा…! दुसऱ्यांच्या रूपाचे, रंगाचे, लावण्याचे, सौंदर्य आपल्या अंतरी घेऊन चारचौघात मिरवत असतो आरसा… कदाचित तो कोण? त्याचं माणसाच्या जीवनातील स्थान काय हे त्याला माहिती देखील नसेल…परंतु दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा मळा फुलवण्यासाठी आयुष्यभर एखाद्या खुंटीला… कपाटावर…टेबलवर …तर कधी भिंतीवर स्वतः तिष्ठत उभा असतो आरसा…! “दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आपण खुश व्हावं” असं आपण वेळोवेळी ऐकत असतो, किंबहुना दुसऱ्यांना सांगत देखील असतो…परंतु आरसा मात्र तोच आनंद उपभोगत असतो. माणूस मात्र आजही त्याच आरशात पाहतोय…स्वतःचा शोध घेतोय…अन् स्वतःमधील सुंदरता शोधतो आहे…तिथे आरसा निस्वार्थीपणे माणसाला सौंदर्याचा आस्वाद घेताना पाहतो आहे.
मनुष्यातील ही सुंदरता म्हणजे आत्मा… आत्म्याचा शोध घेणे म्हणजे परमात्म्याचा शोध घेणे… म्हणूनच संत श्री ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं आहे…
*दर्पणी पाहता रूप ! न दिसे हो आपुले !!* आरश्यात आपल्याला परमात्म्याचे रूप दिसते… आरशामुळेच तर आपल्याला हे शक्य होते…”काया ही पंढरी…आत्मा हा विठ्ठल” माणसाच्या अंतरी असलेला आत्मा म्हणजेच ईश्वर आहे… त्याचं दर्शन दर्पण म्हणजेच आरसा करतो… आरसा नसता तर आपल्याला परमात्मा दिसला असता का…??

©[दीपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

*🚩🚩 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्पेशल ऑफर.!🚩🚩*

*🥳 FREE… FREE… FREE…! 🥳*

*🎼🎼 म्युझिक कॉर्नरची 🎼🎼*
*||गुढी पाडवा स्पेशल ऑफर||*

*🥵कडक उन्हाळ्यात ‘गारवा’ म्युझिक कॉर्नरचा !🥶*

*🖥️ LED TV खरेदीवर कुलर एकदम *फ्री…फ्री…फ्री‌‌…!*💾*

*🎛️ म्युझिक कॉर्नर*🎛️
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*🖥️ LED TV खरेदीकरा आणि मिळवा बजाज कंपनीचा 8000 किंमतीचा कुलर FREE तेही वॉरंटी सहित*💾*

*🌀BAJAJ FINSERV*
*0% शुन्य टक्के व्याजदर*

🔹 *19,990 मध्ये 43 Inch Smart TV 🖥️+ Bajaj Air Cooler💾*

🔹 *11,990 मध्ये 32 Inch Smart TV 🖥️ Bajaj Air Cooler💾*

*🔷SAMSUNG 🔶LG 🔷Realme 🔶 SONY 🔷Itel 🔶Aiwa 🔷Vu 🔶Haier 🔷Panasonic. 🔶MI 🔷1+ ONEPLUS*

*आदि ब्रॅण्डेड कंपनीचे प्रोडक्ट्स.*

*संपर्क*
*📲 9579273091/ 8799978651*

*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

🔶 *25,999 चा ब्रॅण्डेड VU 43″ ANDROID LED TV खरेदीवर मिळवा Morphy Richards कंपनीचा 13000 किमतीचा OTG*
*FREE…FREE…FREE…*
*(3 वर्षांचा वॉरंटीसह)*
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
*📱जुना मोबाईल द्या, नवा घेऊन जा…!📲*

*😍25 %Off*
*SPECIAL DISCOUNT*

*💁🏻‍♂️कोणत्याही स्मार्ट फोनवर 25% च्या वर भरघोस सुट*

*🙏स्वप्न तुमचं, फायनान्स आमचं 🙏*
*📌0% BAJAJ FINASERY*
*📌SAMSUNG Finance+*

*🎁स्मार्ट फोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू🎁*

*💸CASH BACK Up To 7000/-*

*♦️Up To 60% Off ON Mobile Assessories*

*📲संपर्क: 8799978651*

*पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जयप्रकाश चौक, सावंतवाडी*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा