You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पोईप येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पोईप येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

मालवण:

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भव्य मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिर पोईप ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आले . पोईप येथील नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ पोईप गावचे सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पालव परशुराम नाईक तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम पालव यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिराला पोईप पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्ररोग तज्ञ डॉ. भाग्यश्री धामतिडक यांच्या उपस्थितीत नेत्रतपासणी करण्यात आली.

नेत्र तपासणी केल्यावर ज्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे अशा नागरिकांच्या डोळ्यांची आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आले होते.

पोईप येथे ग्रामपंचायत सदस्य पंकज वर्दम, गिरीश पालव पोईप विभाग प्रमुख विजय पालव, माजी सरपंच शिवरामपंत पालव उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण,पोईप महिला विभाग प्रमुख आरती नाईक, शाखा प्रमुख अनिल येरम, पोईप संस्थेचे चेअरमन विठ्ठल नाईक, व्हाईसचेअरमन राजेंद्र पालव, विलास सांडव,नाना तावडे, पांडुरंग चव्हाण,बाळा सांडव आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा