कणकवली नगरपंचायत १ कोटी ५७ लाख, देवगड १ कोटी ९३ लाख व वैभववाडी १ कोटी ५० लाख
आमदार नितेश राणें कडून मतदारसंघात विकास कामांचा धडाका
कणकवली
गेल्या तीन वर्षात कणकवली विधानसभा मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढत असताना कोट्यावधी रुपयांचा विकास निधी कणकवली मतदारसंघाकरता आणून आमदार नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने कणकवली मतदारसंघात यावर्षी विकासाचा झंझावात उभा केला आहे. त्याचा एक भाग म्हणून आता पुन्हा मतदार संघातील कणकवली, वैभववाडी व देवगड या तीन नगरपंचायतीकरिता आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत निधी मंजूर झाला आहे. तीन नगरपंचायती करिता तब्बल 5 कोटी रुपयांच्या निधी ला मंजुरी मिळाली आहे. यात कणकवली नगरपंचायत हद्दीतील विविध कामांसाठी 1 कोटी 57 लाख, देवगड नगरपंचायत करिता 1 कोटी 93 लाख, तर वैभववाडी नगरपंचायत साठी 1 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तसेच यापूर्वी कणकवली नगरपंचायत करिता तब्बल 10 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती . त्यामुळे कणकवली मतदारसंघात विकासाचा झांझावात सुरू असून, आमदार नितेश राणे यांनी सत्तेत चे दृश्य परिणाम या माध्यमातून दाखवून दिले आहेत. या विकास कामांबद्दल सर्व सामान्य जनतेमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.