You are currently viewing सतीश सावंत व संजना सावंत यांच्यात बाचाबाची…

सतीश सावंत व संजना सावंत यांच्यात बाचाबाची…

कणकवलीत मतदान केंद्रावरील प्रकार; पोलिसांचा हस्तक्षेप…*

कणकवली

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतदाना दरम्यान कणकवली मतदानकेंद्रात उमेदवार सतीश सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोहोंना बाजूला केले.

कणकवली मतदान केंद्रात उमेदवार सतीश सावंत केंद्र परिसरात थांबले होते, तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत देखील या मतदान केंद्र परिसरात होत्या. समोरासमोर आल्याने दोघांमध्येही जोरदार बाचाबाची झाली,असून पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला आहे. मात्र या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा