You are currently viewing मालवाहतुकीचे 25 टक्के काम राज्य मार्ग परिवहन मंडळास मिळावे

मालवाहतुकीचे 25 टक्के काम राज्य मार्ग परिवहन मंडळास मिळावे

महामंडळाची महाकार्गो मालवाहतूक सेवा – प्रकाश रसाळ

सिंधुदुर्गनगरी

विविध संस्था, महामंडळे यांच्या मार्फत होणाऱ्या मालवाहतुकीपैकी 25 टक्के मालवाहतुकीचे काम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन  मंडळास शासन निर्णयानुसार देण्यात यावे. जिल्हाअंतर्गत माल वाहतुकीचा करार संपुष्टात आला असल्यास व नवीन निविदा प्रक्रिया राबवून माल वाहतुकदाराची निवड व्हायची असल्यास दरम्यानच्या कावावधीत जुन्या दराने वाहतूक करण्यास महामंडळास संधी द्यावी, असे आवाहन राज्य परिवहन विभाग नियंत्रण प्रकाश रसाळ यांनी केले आहे.

                        20 मे 2021 रोजी गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार शासनाच्या विविध विभागांमार्फत निविदा प्रक्रिया करून खासगी मालवाहतूकदार यांच्या मार्फत जी वाहतूक करण्यात येते त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास 25 टक्के माल वाहतुकीचे काम देण्यात यावे. हे 25 टक्के काम विभागांच्या निविदा प्रक्रियाद्वारे निवड करण्यात आलेल्या खासगी वाहतुकदारांना जो दर अनुज्ञेय करण्यात येईल त्या दराने देण्यात यावे. त्यासाठी महामंडळास निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची आवश्यकता असणार नाही असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. महामंडळाने 21 मे 2020 पासून मालवाहतुकीची सेवा सुरू केली असून महाकार्गो या नावाने 22 एप्रिल 2021 पासून नव्या रंगसंगतीने सुरू केलेली आहे. महामंडळाच्या 1 हजार 150 ट्रक्स मार्फत 95 हजार फेऱ्या व 1 कोटी 40 लाख किलोमीटरची मालवाहतूक केली असून 8 लाख मेट्रीक टन मालाची वाहतूक महामंडळाने केली आहे.

            महामंडळाच्या मालवाहतूक सेवेस प्राधान्य देण्यात येऊन शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी. महामंडळातर्फे माल वाहतुकीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रकाश रसाळ – विभाग नियंत्रक 7507470474, महोनदास खराडे, मालवाहतूक प्रमुख – 9404444440, संग्राम शिंदे, मालवाहतूक नोडल अधिकारी – 8459462957, ई-मेल – msrtc.logisticsndg@gmail.com त्यावर संपर्क करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा