You are currently viewing नंबर, OTP नाही तर सिम स्वॅप करून एका सेकंदात बँक अकाउंट होणार रिकामं…

नंबर, OTP नाही तर सिम स्वॅप करून एका सेकंदात बँक अकाउंट होणार रिकामं…

नवी दिल्ली

डिजिटल युगात बर्‍याच बँकिंग सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. यात आपल्या खात्यातून दुसर्‍याच्या खात्यात पैसे ट्रान्सफरही करता येतात. बँकेत जाणं टाळण्यासाठी हल्ली लोकं NEFT, Net Banking, RTGS किंवा UPI चा वापर करून एका अकाउंटमधून पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतात. या सुविधा वेळ आणि सोयीसाठी अधिक चांगल्या आहेत. मात्र आपण या सेवा देखील वापरत असल्यास आपण सतर्क असले पाहिजे. कारण, तुम्हाला हे माहित नाही की हॅकरचा तुमच्या अकाउंटवर डोळा आहे आणि सिम स्वॅपिंगद्वारे तुमचे अकाउंट रिकामी करू शकते.

जाणून घ्या काय आहे सिम स्वॅपिंग?

काळानुसार हॅकर्सनेही बॅंक खात्यातून पैसे लुबाडण्याचा मार्ग बदलला आहे.

याआधी तुम्हाला कॉल करून डेबिट कार्ड नंबर आणि ओटीपी विचारून अकाउंट निकामी केले जात होते. मात्र आता सिम स्वॅपिंगचा वापर करून अकाउंटमधली माहिती घेतली जाते. सिम स्वॅपिंगमध्ये हॅकरना तुमचा सिम (डुप्लिकेट सिम) बदलला असेल तर तुम्हाला काही विचारण्याची गरज नाही. कारण सर्व मेसेज आणि ओटीपीसह कॉल आपोआप हॅकर्सपर्यंत पोहोचू लागतील. ज्याच्या मदतीने हॅकर्स कधीही आपल्या खात्यातून पैसे काढू शकतात.

कसं केलं जातं सिम स्वॅपिंग?

हॅकर सिम स्वॅप करण्याआधी मोबाइल सर्विस प्रोवायरडला ते ग्राहक असल्याचे दाखवतात आणि अशा प्रकारे तुमच्या मोबाइल क्रमांकाचा इंडिप्लिकेट सिम तयार केले जाते. बर्‍याच वेळा मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचे कर्मचारीदेखील यात सामिल असतात. त्यांना हॅकर्स लाच देतात.

असं टाळा सिम स्वॅपिंग

सिम स्वॅपिंग आणि इतर फसवणूक टाळण्यासाठी बँका वेळोवेळी ग्राहकांना सतर्क करतात. आपणास सिम स्वॅपिंग टाळायचे असल्यास नेहमी सतर्क असले पाहिजे. आपला फोन चालू असताना आपला फोन अचानक बंद किंवा आउट ऑफ रीच असेल तर अशा परिस्थितीत त्वरित मोबाइल सर्विस प्रोवायरडशी संपर्क करा आणि बॅंकेला याबाबत माहिती द्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − seven =