You are currently viewing राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांची गोवा बनावटीच्या दारुवाहतुकीवर धाड ; ४३ लाख २० हजाराची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांची गोवा बनावटीच्या दारुवाहतुकीवर धाड ; ४३ लाख २० हजाराची दारू जप्त

कणकवली :

मुंबई गोवा महामार्गावर तरळे येथे मालवाहू टेम्पोच्या मध्ये छुप्या पद्धतीने गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असताना राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कणकवली यांनी तरळ येथे सदर टेम्पोवर छापा टाकला दरम्यान या टेम्पोमध्ये गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्याचे ४३,२०,००० रु. दारूचे ९०० बॉक्स जप्त केले. याप्रकरणी टेम्पोचालक भाऊसाहेब दत्तू खरात, रा. वेताळनगर, याखारी, केडगाव ता. दौड जिल्हा पुणे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावर तरड येथे सकाळी साडेदहा वा. च्या. दरम्यान गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे ९०० बॉक्स ची वाहतूक करताना एक टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्कने धडक कारवाई केली. दरम्यान टेम्पामध्ये छुप्या पध्दतीने वाहतूक होत असताना गोवा बनावट दारुचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये अंदाजे ४३,२०,००० ₹ ची गोवा बनावट ची दारू व १०,००,००० ₹ चा टेम्पो व इतर मुद्देमाल असा एकूण ₹ ५३,३५,२१०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी टेम्पोचालक भाऊसाहेब दत्तू खरात, रा. वेताळनगर, याखारी, केडगाव ता. दौड जिल्हा पुणे याला ताब्यात घेवून रिमांडकामी हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

सदर कारवाईत डॉ. बी. एच. अक्षको सिंधुदुर्ग यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार निरीक्षक प्रभात सावंत, एस.डी. पाटील दुय्यम निरीक्षक जे. एस. मानेमोड दुय्यम निरीक्षक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, महिला जवान स्नेहल कुबेसकर, जगन चव्हाण वाहनचालक हे सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा