You are currently viewing आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा शुभारंभ

आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा शुभारंभ

*५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प*

 

*असरोंडी येथे ६५ तर पिंगुळी येथे ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

कुडाळ :

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी असरोंडी येथे रक्तदान शिबिराचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे असरोंडी येथे ५ महिलांनी देखील रक्तदान केले. तसेच आज सोमवारी पिंगुळी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्येही ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

उद्या २१ मार्च २०२३ रोजी कुडाळ शिवसेना शाखा, २३ मार्च पावशी, २४ मार्च घोटगे व २६ मार्च रोजी विजयराव नाईक फार्मसी कॉलेज, शिरवल येथे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.

पिंगुळी येथे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, रुपेश पावसकर, अतुल बंगे,विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, महिला विभाग संघटक निर्मला पालकर, युवासेना विभागप्रमुख सिद्धेश धुरी, राजन सडवेलकर, तुळशीदास पिंगुळकर, महेश पालकर,अंजली जाधव, श्री. गावडे, कु. पेडणेकर, सौ.गावडे, दिलीप नीचम,तातू मुळीक, शाखा प्रमुख आदेश धुरी, राघोबा धुरी, श्री. धुरी, साई मित्रमंडळाचे अध्यक्ष संकेत धुरी मंडळाचे सदस्य आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

आडवली मालडी विभाग प्रमुख बंडू चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, विभागसंघटक संतोष घाडी, उपविभाग प्रमुख अंबाजी सावंत,अमित फोंडके, महिला विभाग प्रमुख आरती साटम,असरोंडी सरपंच अनंत पोईपकर, असरोंडी उप सरपंच आदित्य सावंत,रामगड सरपंच शुभम मटकर,बुधवळे सरपंच पाणवलकर, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, ओवळीये उपसरपंच संजय पडवळ, असगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे, छोटू गावकर, असरोंडी शाखा प्रमुख सुनील सावंत,युवासेना विभाग प्रमुख बंडू गावडे, राजू घागळे, बबन येरम, श्री. मांजरेकर, स्वप्नील पुजारे,सचिन परब, हिवाळे शाखा प्रमुख गोट्या गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + fourteen =