You are currently viewing जावेद खतीब यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

जावेद खतीब यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

जावेद खतीब यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती

बांदा

उपसरपंच तथा भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जावेद खतीब यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी त्यांना निवडपत्र दिले आहे.
श्री. खतीब हे भाजपचे क्रियाशील पदाधिकारी आहेत. बांदा शहर ग्रामपंचायतीत ते उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी सलग दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजय मिळविला आहे. भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत ते युवा मोर्चा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्याची पक्षीय पातळीवर दखल घेत त्यांची सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने त्यांचे बांदा शहरात अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =