You are currently viewing कुठे विणू माझा खोपा

कुठे विणू माझा खोपा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कुठे विणू माझा खोपा*

 

कुठे विणू माझा खोपा

इवलासा माझा जीव

छोटीशी तरी जागा मजला

येईल कुणा का कीव।।

 

हिरव्या फांदीवरती बसून

पहाटेस चिवचिवते

बाळाला मी किती आवडते

बघता खुदकन हसते।।

 

मला पाहता घास चिऊचा

आई भरविते बाळाला

निसर्ग निरखत गोष्ट चिऊची

कुशी निजतो तान्हुला।।

 

नाचाया,बागडावयला

मुक्त मोकळे अंगण

खोप्यासाठी शोधायाचे

उंच अशी वळचण।।

 

विकास करण्यासाठी नष्ट

जमीन जंगल अंगण

घरटे बांधू आता कुठे मी

प्रश्न मनाला गहन।।

 

कृत्रिम खोपा आणि पाणी

मजसाठी कुणी ठेवा

झाड एकतरी चिऊसाठी

अपुल्या शेजारी लावा।।

 

चिवचिव चिमणी मला लळा

तुमच्या तो सहवासाचा

नाद मधुर कानावर पडण्या

व्हावे चिमणीचे त्राता….।।

 

००००००००००००🕊️🌳🌿

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा