You are currently viewing शिंदे गट राजकीय पक्ष नाहीच..

शिंदे गट राजकीय पक्ष नाहीच..

ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवादामुळे मोठा ट्विस्ट

 

मुंबई :

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आलेली नाही. शिंदे गटाकडून तसं काहीही झालेलं नाही. त्यामुळे शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही…. असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. “दरवर्षी पाच वर्षात निवडणूक आयोगात सर्व पक्षाची प्रक्रिया सादर करावी लागते. त्याच पद्धतीची प्रक्रिया ठाकरे गटाकडून होते. त्यामुळे शिवसेना हा राजकीय पक्ष नाही. ज्यावेळेस पक्षाच्या बैठका बोलावलेल्या होत्या त्यावेळेस शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीला निघून गेले. पक्षाने बोलावलेल्या बैठकीत या आमदारांनी येणं अपेक्षित होतं. लोकशाही पद्धतीने त्यांनी आपलं मत मांडता आलं असतं. त्यांनी म्हणणं न मांडता पक्ष सोडला”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही. शिंदे गटाच्या नेत्यांनी लोकशाहीनुसार म्हणणं मांडायला हवं होतं. ते गुवाहाटीला का गेले? पक्षाला बोलावलेल्या सभेत शिंदे गट उपस्थित नव्हते. शिंदे गट राजकीय पक्ष नाही”, असं कपिल सिब्बल म्हणाले. प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगात केलेली आहे. पण शिंदे गटाने ती केलेली नाही. त्यामुळे शिंदे गट राजकीय पक्ष नाही. त्यांनी निवडणूक आयोगात कोणतीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे शिंदे गट स्वत:ला राजकीय पक्ष म्हणत असेल तरी शिंदे गट राजकीय पक्ष नाही”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =