You are currently viewing एकदिवसीय सामन्यात भारताचा ‘सर्वात मोठा’ पराभव, ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय; दुसरा सामना ३७ षटकांत संपला

एकदिवसीय सामन्यात भारताचा ‘सर्वात मोठा’ पराभव, ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय; दुसरा सामना ३७ षटकांत संपला

*एकदिवसीय सामन्यात भारताचा ‘सर्वात मोठा’ पराभव, ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय; दुसरा सामना ३७ षटकांत संपला*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारू संघाने भारतीय डाव २६ षटकांत ११७ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात त्याने ११ षटकांत १२१ धावा करत सामना आपल्या नावावर केला. ५०-५० षटकांचा हा एकदिवसीय सामना एकूण ३७ षटकांत संपला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून २२ मार्च रोजी चेन्नई येथे होणारा तिसरा सामना एकप्रकारे अंतिम सामना असेल.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची शीर्ष फळी या सामन्यातही अपयशी ठरली. पॉवरप्लेमध्ये (सुरुवातीचे १० षटके) अर्धा संघ तंबूमध्ये परतला. स्टार्कने पहिल्याच षटकात शुभमन गिलला लबुशेनकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शुभमन मागील सामन्यात जसा बाद झाला होता त्याच पद्धतीने तो बाद झाला. यानंतर डावाच्या पाचव्या षटकात स्टार्कने कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्टार्कने रोहितला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. रोहितला १५ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १३ धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव पायचीत बाद झाला. याआधीच्या सामन्यात जसा बाद झाला होता तसाच सूर्याही बाद झाला. सूर्याला सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खातेही उघडता आले नाही.

केएल राहुल हा मिचेल स्टार्कचा पुढचा बळी ठरला. राहुलला १२ चेंडूत ९ धावा करता आल्या. गेल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते, पण यावेळी त्याची बॅट चालली नाही. स्टार्कने राहुलला पायचीत केले. शॉन अॅबॉटने भारताला पाचवा धक्का दिला. त्याने हार्दिक पांड्याला (१) स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. हवेत झेपावत स्मिथने हा झेल टिपला. भारताला १६व्या षटकात सहावा धक्का बसला. विराट कोहली ३५ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. त्याने चार चौकार मारले.

९१ धावांवर भारताला सातवा धक्का बसला. नॅथन एलिसने रवींद्र जडेजाला कॅरीकरवी झेलबाद केले. त्याला ३९ चेंडूत १६ धावा करता आल्या. १०३ धावांवर भारताला आणखी दोन धक्के बसले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर सीन अॅबॉटने कुलदीप यादवला (१७) हेडकरवी झेलबाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला (०) यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. स्टार्कने सिराजला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव ११७ धावांत गुंडाळला.

मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पटकन सामना संपवला. मार्शने ३६ चेंडूत ६६ तर ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूत ५१ धावा केल्या. मार्शने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. हेडने १० चौकार मारले.

मिचेल स्टार्कला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने ५३ धावांच्या मोबदल्यात ५ गडी बाद केले. त्याने आजवर ९ सामन्यांत ५ गडी बाद केले आहेत.

 

_______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

————————-‐——,———-

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

_______________________________

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा