You are currently viewing सावंतवाडी तालुक्यात भाजपचेच वर्चस्व…

सावंतवाडी तालुक्यात भाजपचेच वर्चस्व…

११ पैकी ८ ग्रामपंचायतवर भाजपचे सरपंच

सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यात अलीकडेच पार पडलेल्या ११ ग्रामपंचायत पैकी ८ पंचायतीवर भाजपचाच झेंडा फडकला आहे. तालुक्यातील मळगाव, कोलगाव, आरोंदा, मळेवाड, आंबोली, चौकुळ, डिंगणे, दांडेली या सर्व या ग्रामपंचायतवर भाजपचे सरपंच व उपसरपंच विराजमान झाले असून तळवडे इन्सुली व आरोस या तिनच ठिकाणी सेनेला यश प्राप्त झाले आहे.

इन्सुलीत शेवटच्या क्षणी भाजपचे तात्या वेंगुर्लेकर यांनी सेनेत प्रवेश केल्याने येथे भाजपला धक्का बसला. तर आरोंदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला आपला सरपंच बसवता आला. त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. या ठिकाणी अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जंगजंग पछाडले मात्र भाजपच्या प्रामाणिक सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =