You are currently viewing परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मनसेचे महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन

परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मनसेचे महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन

सावंतवाडी

केंद्र सरकारने अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार रोजगाराचे नियमन आणि सेवेच्या अटी अधिनियम, १९७९ हा कायदा लागु केला आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी सावंतवाडी तालु तालुक्यात होताना दिसत नाही. याबाबत त्वरित कार्यवाही होण्याकरिता सावंतवाडी मनसेच्यावतीने तहसील व पोलीस प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. निवेदनात असे म्हटले आहे कि आज तालुक्यात विविध क्षेत्रात परप्रांतिय लोक काम करत आहे.या परप्रांतियात मजुर म्हणुन काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

उत्तरप्रदेश,बिहार,आसाम,गुजरात मध्यप्रदेश,केरळ,झारखंड या राज्यातील परप्रांतिय लोक अनधिकृत पणे राहत आहेत.स्थलांतरित कामगार कायद्याप्रमाणे त्यांची नोंद नाही सबब सदर बाब गंभीर स्वरुपाची असुन सावंतवाडी तालुक्यात या परप्रांतियांकडून येणाऱ्या काळात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडू शकतात. मागील काळात सावंतवाडी,दोडामार्ग येथे गेल्या दोन तीन वर्षात परप्रांतियांकडून खुन,दरोडा या सारखे गुन्हे घडले आहेत.अजुनही काही आरोपी बेपत्ता आहेत.पोलिस यंत्रणेचा बराच कालावधी आरोपींना शोधण्यासाठी जात आहे

म्हणुन सावंतवाडी तालुक्याला भविष्यात होणारा धोका लक्षात घेता परप्रांतीय लोक ज्यात प्रामुख्याने येणारे,बांधकाम कामगार,वाळु कामगार,चायनीज सेंटर मध्ये काम करणारे नेपाळी तसेच आंबा बागेत काम करणारे ,हॉटेल मध्ये काम करणारे मजुर,चिरे खाण कामगार,विंधन विहीर(बोअरवेल) खोदणारे कामगार,केशकर्नालय कामगार या सर्वांची नोंद फोटो ओळखपत्रासहीत होणे आवश्यक आहे

नोंद होण्यासाठी तहसिल कार्यालय व पोलिस यंत्रणा यांनी सहमतीने नोंदणी अधिकारी प्राधिकृत करावा. तसेच नोंदणी अधिकारी नोंद करून कायद्याची अंमलबजावणी करत असताना जे लोक १५ वर्षापासून वास्तव्यास राहत आहेत व ज्यांचे स्थानिक पत्यावर आधार कार्ड,मतदान ओळखपत्र आहे अश्या नागरिकांना नोंदणी पासून सवलत द्यावी.

यावेळी उपस्थित मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार उपशहर अध्यक्ष शुभम सावंत देवेंद्र कदम मनविसे तालुका अध्यक्ष ओमकार कुडतरकर संजय पाटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − six =