You are currently viewing ओटवणे येथील नदीपात्रात मासेमारी करताना बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला…

ओटवणे येथील नदीपात्रात मासेमारी करताना बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला…

सावंतवाडी

ओटवणे येथील नदीपात्रात बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. जितेंद्र उर्फ राजू उत्तम तारी (३४) रा. तारीवाडी, असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास घडला होता. संबंधित युवक बुडाल्याची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर “तो” मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक आपल्या मित्रांसमवेत मासेमारीसाठी ओटवणे-तारीवाडी येथील नदीपात्रात उतरला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. त्याला वाचविण्यासाठी सोबत असलेल्या मित्रांनी प्रयत्न केले. मात्र तो कोणाच्याच हाती लागला नाही. त्यानंतर याबाबतची माहिती त्याच्या नातेवाईकांना तसेच पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबविली. या शोध मोहिमेला सात वाजण्याच्या सुमारास यश आले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 9 =