You are currently viewing २५ व २६ मार्च रोजी वेंगुर्ले – वायंगणी किनाऱ्यावर कासव महोत्सवाचे आयोजन

२५ व २६ मार्च रोजी वेंगुर्ले – वायंगणी किनाऱ्यावर कासव महोत्सवाचे आयोजन

वेंगुर्ला :

 

सावंतवाडी वनविभागाच्यावतीने २५ आणि २६ मार्च या कालावधीत वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बीच येथे ‘कासव महोत्सव वायंगणी २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सिधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार हे उपस्थित रहाणार आहेत.

दि. २५ मार्च रोजी सकाळी ७.४५ वा. नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या हस्ते नैसर्गिक अधिवासांत सोडणे, ८.३० वा. उद्घाटन, ९.४५ वा. मांडवी खाडी येथे कांदळवन सफर, ११ वा. कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन, १२.३० वा. कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ठ काम करणा-या कासव मित्रांचा सन्मान, सायं. ५ वा. कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शनपर चित्रफित, ५.३० वा. कांदळवन कक्षाच्या दुर्गा ठिगळे यांचे कांदळवन संवर्धनाबाबत मार्गदर्शन, ७.३० वा. ‘कुर्म अवतार‘ हा पौरार्णिक दशावतार नाट्यप्रयोग, दि. २६ मार्च रोजी सकाळी ७.३० वा. नवजात समुद्री कासव पिल्लांना नैसर्गिक अधिवासांत सोडणे, ८.३० वा. वायंगणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिम, ९.३० वा. कोंडुरा डोंगरावर नेचर ट्रेल, सकाळी ११ वा. कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ वनपरिक्षेत्राचे अधिकारी अमृत शिदे, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =