You are currently viewing “मी भारतीय” या दीर्घांकांचा मोफत प्रयोग

“मी भारतीय” या दीर्घांकांचा मोफत प्रयोग

कुडाळ :

 

रवींद्र देवधर, प्रदीप तुंगारे, शिरीष कुलकर्णी व कलाकार अक्षय सातार्डेकर व रवींद्र देवधर , संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या सहकार्यातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक भवनामध्ये ०८ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सर्व भारतीयांसाठी विनामूल्य प्रयोग सादर केला जाणार आहे. १५ ऑगस्ट १९४७ आपल्या भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण. त्या दिवसाची पहाट उगवली ती कोंबड्याच्या आरवण्याने नव्हे तर मंगल वाद्यांच्या सुरावटीने सूर्याचे किरण आपल्या स्वतंत्र झालेल्या राष्ट्रावर प्रथमच अवतरले होते. प्रत्येक जण त्या सूर्याकडे नव्या आशेने, नव्या प्रेरणेने व विजयी मुद्रेने पाहत होता. कारण तो होता भारताचा स्वातंत्र्यदिन! असंख्य क्रांतीकारकांनी मिळालेले स्वातंत्र्य ,असंख्य संसार उध्वस्त करून मिळालेले स्वातंत्र्य .खूप काही गमावून आता मिळालेले स्वातंत्र्य! विविध रंगांच्या रांगोळ्याखाली रक्त लपवलेलं हे स्वातंत्र्य, अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नाने मिळवलेल्या स्वातंत्र्य! आज आपण या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. देशाला स्वतंत्र होऊन ७४ वर्षे झाली. या संपूर्ण काळात आपण खूप प्रगती केली. अनेक क्षेत्रात सक्षम झालो.स्वयंपूर्ण झालो विचार आचार आणि आपल्या भारताने बलशाली प्रगतीपथावर असलेली एक आदर्श शिंदे भारताची प्रतिमा सगळ्या जगावर उमटवली पण ज्या सक्षम बुद्धिमान तरुण पिढीने आता या राष्ट्राची धरा सांभाळायची ती पिढी आपल्या हुशारीने परदेशाच्या झुकते माप टाकते आहे.आपल्या देशाकडे पाठ फिरवून प्रदेशाकडे डोळे लावून बसले आहेत. जणू देशप्रेमाची भावना लोप पावली आहे, म्हणूनच आजच्या पिढीला नवी दिशा दाखविण्यासाठी चे एक पाऊल म्हणजे “मी भारतीय नाही” तर दीर्घकाळ लक्षात राहणारा, स्वातंत्र्यलढ्याच्या उजळणीचा धडा हे नव्या पिढीच्या मनातील देशप्रेमाच्या रोपट्याला खतपाणी घालण्याचा एक प्रयत्न आहे. तुमच्या आमच्या मनातील देशप्रेम म्हणजेच “मी भारतीय हा दीर्घअंक! देशप्रेमाला सर्वांच्या मनात रुजविण्यासाठी आपल्या सर्वांची आवश्यकता आहे. तर भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात गाजत असलेल्या “मी भारतीय” या दीर्घअंकाचे आपल्या परिसरात आयोजन केलेले आहे. आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत. याचा आनंद घ्यावा, असे आवाहन रवींद्र देवधर त्यांच्या सहकार्‍यांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा