वैभववाडी
महाराष्ट्रातील सुमारे २० लाख शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी दि.१४ मार्चपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. या बेमुदत संपात वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. सन २००५ नंतर नोकरीत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका झाल्या आहेत त्या नियमित करण्यात याव्यात. सरकारी, निमसरकारी कार्यालय व महाविद्यालय तसेच शाळांमध्ये जी रिक्त पदे आहेत ती त्वरित भरण्यात यावीत. या सर्व मागण्यांसाठी केलेल्या संपामध्ये वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या बेमुदत संपात १४ मार्चपासून सहभागी आहेत.