वादात सापडलेल्या डॉ.सचिन बर्गेचा तडका फडकी राजीनामा…..

मानसिक खच्चिकरण केल्याचा आरोप; राजकारणात टिका झाल्याचे म्हणणे..

वैभववाडी प्रतिनिधी
स्मशानात जावून स्वॅब घेतल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर येथिल वैदयकीय अधिकारी डॉ.सचिन बर्गे यांनी नाराजी व्यक्त करीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.आपल्याला मानसिक त्रास देण्यासाठी काही राजकीय मंडळीकडुन हा प्रकार करण्यात आला. आपल्यावर झालेले आरोप खोटे आहेत. असा त्यांनी दावा केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका कळविली आहे.
यात त्यांनी असे नमुद केले आहे की, माझ्यावर झालेला आरोप हा हेतूपुरस्कर व बदनामी करण्यासाठी केलेला आहे. यात कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. मी स्मशानभूमीत जावून कुठलाही स्वॅब घेतलेला नाही. शासन निर्णया प्रमाणे मृत व्यक्तीचा स्वॅब घेणे गरजेचे आहे. अत्यंविधीला येणार्‍या लोकांची सुरक्षितता लक्षात घेता, तो स्वॅब घेतला जातो. याची वरिष्टांना कल्पना दिली होती. स्वॅब संबधित मृताच्या घरी जावून तसेच नातेवाईकांना पुर्व कल्पना देवून घेतला होता. रिपोर्ट मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे काहीही न आढळून आल्याने फॉल्स पॉझिटिव्ह रिपोर्ट जाहीर केलेला नाही. जवळच्या व्यक्तींना काळजी घेण्याचे सुचविले होते. नासिर काझी यांनी केलेले आरोप हे राजकीय हेतू पुरस्कर केलेले आहेत. ज्यामुळे माझ्या सारख्या डॉक्टरांना खुप मानसिक त्रास व खच्चिकरण झालेले आहे. त्यामुळे मी राजीनामा देवून घरी परतलो आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये डॉक्टर नोकरी सोडत आहेत, हे सदयस्थितीत योग्य नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =