You are currently viewing वैभववाडी – एडगाव वायंबोशी नवीन एसटी फेरी चालू करा आमदार नितेश राणे विभाग नियंत्रक यांच्याकडे मागणी

वैभववाडी – एडगाव वायंबोशी नवीन एसटी फेरी चालू करा आमदार नितेश राणे विभाग नियंत्रक यांच्याकडे मागणी

*वैभववाडी – एडगाव वायंबोशी नवीन एसटी फेरी चालू करा आमदार नितेश राणे विभाग नियंत्रक यांच्याकडे मागणी*

*भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या मागणीची आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल*

*वैभववाडी-*

वैभववाडी तालुक्यातील एडगाव वायंबोशी या गावात अद्याप एसटी फेरी चालू नसल्यामुळे गावातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या गावातील विद्यार्थ्यांना देखील एसटी अभावे पायपीट करावी लागत आहे याबाबत धनगर समाजाचे युवा नेते तथा भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी एस टी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे. मागणीच्या अनुषंगाने कोरोनाच्या आधी एकदा वैभववाडी – एडगाव वायंबोशी अशी ट्रायल एस टी बस प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचली होती. कोरोना व त्यानंतर एसटी महामंडळाचा संप त्यामुळे या कामाला अडथळे निर्माण झाले. परंतु कोरोना आणि एसटीचा संप संपून बरेच वर्ष झाली तरी महामंडळ प्रशासन यावर कोणतीच पावले उचलत नसल्याचे निदर्शनास येताच पुन्हा एकदा ही एसटी बस सेवा चालू करण्याकरिता नवलराज काळे यांनी हालचाल चालू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांच्याकडे नवलराज काळे यांनी लेखी स्वरुपात मागणी करून सदर एसटी चालू करण्याकरिता आपल्या स्तरावरून पाठपुरावा व्हावा अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार नितेश राणे यांनी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागीय कार्यालय कणकवली यांना पत्र दिले आहे सदर पत्रात असे नमूद केले आहे की, माझ्या मतदारसंघातील वैभववाडी – एडगाव वायंबोशी येथे एसटी फेरी नसल्यामुळे ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे त्यामुळे शाळे विद्यार्थी व प्रवासी यांचे खूप येण्या-जाण्याचे हाल होत आहेत याबाबत श्री नवलराज काळे भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग यांनी निवेदन दिले आहे सदर निवेदन सोबत जोडत असून निवेदनात केलेल्या मागणी ची त्वरित अंमलबजावणी करावी असे नमूद केले आहे. आमदार नितेश राणे यांच्या या पत्रामुळे नवलराज काळे यांच्या पाठपुराव्याला आणखी ताकद मिळाली असून येणाऱ्या काळात महामंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. सदर शिफारस पत्र मिळाल्याबद्दल जनतेच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे नवलराज काळे यांनी आभार मानले असून निश्चितपणाने एसटी बस सेवा चालू करण्याच्या पाठपुराव्याला यश येईल आणि ग्रामस्थांचा व विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा