You are currently viewing सिंधुदुर्ग भरारी पथकाची बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या प्रवाशी मॅक्स गाडीवर कारवाई 

सिंधुदुर्ग भरारी पथकाची बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या प्रवाशी मॅक्स गाडीवर कारवाई 

शोधसिंधुदुर्ग भरारी पथकाची बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या प्रवाशी मॅक्स गाडीवर कारवाईची

10 लाख 88 हजारचा मुद्देमाल जप्त: कोल्हापुरी येथील एक ताब्यात…

बांदा

गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या प्रवाशी मॅक्स गाडीवर उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने ओरोस जिजामाता चौक येथे कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह १० लाख ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर याप्रकरणी विठ्ठल गोविंद पाटील (वय ३५, रा. कडगाव, ता भुदरगड जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची पक्की खबर भरारी पथकाला होती. त्यानुसार भरारी पथकाचे कर्मचारी जिजामाता चौकात ठाण मांडून होते. दरम्यान गोव्याहुन मुंबईच्या दिशेने जाणारी मॅक्स प्रवासी वाहतूक करणारी (एमएच ११ वाय १७५८) आली असता त्या गाडीस त्यांनी थांबण्याचा इशारा केला. गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील सीटवर तब्बल ५० दारूचे खोके बेकायदा आढळून आले. मिळून आलेल्या मद्याची किंमत केली असता त्याची किंमत २ लाख ८८ हजार व वाहनांची किंमत ८ लाख असा एकूण १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर बेकायदा दारू वाहतूक केल्या प्रकरणीं एकास ताब्यात घेतले.
ही कारवाई अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जाधव, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, विशाल सरवटे, वाहन चालक जगन चव्हाण यांनी केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करत आहेत.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा