You are currently viewing तेली समाजाचा स्नेहमेळावा २८ रोजी कणकवलीत

तेली समाजाचा स्नेहमेळावा २८ रोजी कणकवलीत

तेली समाजाचा स्नेहमेळावा २८ रोजी कणकवलीत

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळातर्फे स्नेहमेळावा व वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन २८ जानेवारीला सकाळी ९ वाजता कलमठ येथील जानवली पुलानजीकच्या वृंदावन हॉल येथे करण्यात आले आहे.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली असून कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर स्वागताध्यक्ष असणार आहेत. उद्घाटन काजू उद्योजक सुरेश नेरुरकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रकार किशार नादावडेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव भूषण कर्डिले, सहसचिव जयेश बागडे, महिला अध्यक्ष रोहिणी महाडिक, कोकण विभाग अध्यक्ष सतीश वैरागी, जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, रत्नागिरी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, गोमंतक हिंदू तेली समाज गोवा संघटनेचे अध्यक्ष अनिल कोंडूरकर, हिंदू तेली समाज गोव्याचे अध्यक्ष स्मितैश तळवडेकर आदी उपस्थित असणार आहेत. उपस्थित रहावे, असे आवाहन तेली समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम तेली, नीलेश कामतेकर, सचिव परशुरामं झगडे, चंद्रकांत तेली यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा