You are currently viewing उद्या १६ एप्रिलला खासदार विनायक राऊत उमेदवारी अर्ज भरणार

उद्या १६ एप्रिलला खासदार विनायक राऊत उमेदवारी अर्ज भरणार

रत्नागिरी :

महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्या मंगळवारी १६ एप्रिल ला वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या निमित्ताने रत्नागिरीत महाविकास आघाडी शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत हे शिवसेनेच्या माशालीया चिन्हावर प्रथमच निवडणूक रिंगणात उतरत आहेत त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण हे अजूनही निश्चित झालेले नाही तर त्या उलट महाविकास आघाडीच्या प्रचाराची पहिली फेरी संपली असून १६ एप्रिल ला खासदार राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

१६ एप्रिल सकाळी ११ वाजता नाचणे रोड येथील खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालयातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येईल. त्यानंतर खासदार राऊत आपला उमेदवारी अर्ज सादर करतील आपण यावेळी विजयाची हॅट्रिक करू आणि पावणेदोन लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी होऊ असा विश्वास विनायकराव यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा