You are currently viewing रखडलेले मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल नगरपालिकेच्या आरक्षित जागेत करावे

रखडलेले मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल नगरपालिकेच्या आरक्षित जागेत करावे

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची जयंत पाटील यांच्याकडे मागणी : आरोग्य मंत्री राजेश टोपे काही दिवसात जिल्हा दौऱ्यावर

सावंतवाडी

सावंतवाडी येथे होणारे मल्टी स्पेशलीस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन होऊन अनेक महिने उलटून गेले आहेत. तरीदेखील अजूनही जागेचा प्रश्न सुडला नसल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे याबाबत सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी नगरपालिकेने आरक्षित केलेल्या जागेचा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल साठी विचार व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील काही दिवसात जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली आहे. या हॉस्पिटल साठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचे मार्गदर्शन घेऊन, जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.याबाबत शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनीदेखील निवेदन देऊन जयंत पाटील यांच्याकडे लक्ष वेधले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =