You are currently viewing बांदा केंद्रशाळेतील पुर्वा मोर्ये व शिवानंद परब प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र

बांदा केंद्रशाळेतील पुर्वा मोर्ये व शिवानंद परब प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र

बांदा

महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेतील इयत्ता पाचवीतील पुर्वा हेमंत मोर्ये व शिवानंद संतोष परब परब हे दोन विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत शाळेतील युवराज मिलिंद नाईक, अनुष्का भगवान झोरे व अनुज दिलीप कदम हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दरवर्षी गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गणित संबोध,प्रावीण्य व प्रज्ञा परीक्षा घेण्यात येतात . गणित प्राविण्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य स्तरीय प्रज्ञा परीक्षेला बसण्याची संधी मिळते.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, केंद्र प्रमुख संदीप गवस यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.या यशस्वीविद्यार्थ्यांना वर्गशिक्षक प्रशांत पवार,सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, जागृती धुरी,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत ,वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस, रंगनाथ परब जे.डी.पाटील गोपाळ साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =