You are currently viewing भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सावंतवाडीत शिवसेनेतर्फे तिरंगा रॅली…

भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सावंतवाडीत शिवसेनेतर्फे तिरंगा रॅली…

सावंतवाडी:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी सावंतवाडी शहरात शिवसेनेतर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी भारत माता की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर, भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यांमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, विनोद सावंत, परिक्षीत मांजरेकर, गुरुनाथ सावंत, महिला पदाधिकारी भारती मोरे, युवासेनेचे प्रतीक बांदेकर, अर्चित पोकळे, निखिल सावंत, ओंकार सावंत, वर्दम पोकळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा