You are currently viewing मुणगे हायस्कुलच्या प्रसाद बागवे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड

मुणगे हायस्कुलच्या प्रसाद बागवे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड

मालवण

शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सन २०२०-२१ मध्ये आयोजित राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचे शिक्षक तथा मुणगे गावचे सुपुत्र प्रसाद नंदकुमार बागवे यांनी यश प्राप्त केले आहे. त्यांनी सादर केलेला नवोपक्रम राज्यस्तरासाठी पात्र ठरला आहे.
‘गणितीय संकल्पना झाली सोपी, यू ट्यूब आले कामी’
हा नवोपक्रम त्यांनी सादर केला होता. यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवले होते. यु ट्यूब च्या माध्यमातून गणित हा विषय मुलांपर्यंत पोचवला.
विज्ञान शिक्षक असलेल्या प्रसाद बागवे यांनी लॉक डाऊन काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमातून ऑनलाइन तसेच ऑफलाईन शिक्षण चालू ठेवले होते. तसेच स्वतःचा यु ट्यूब चॅनेल तयार करून त्याद्वारे अनेक विध्यार्थ्यांना गणित विषयातील संकल्पना सोप्या शब्दात मांडण्याचा उपक्रम चालू केला होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच अनेक शाळा बाह्य उपक्रमात नेहमीच त्यांचा सहभाग असतो. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे, तसेच गरीब विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा प्रसाद बागवे करतात.
त्यांच्या यशाबद्दल श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, माजी कार्याध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, मुख्याध्यापक संजय बांबुळकर, व्यवस्थापक आबा पुजारे यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 8 =