You are currently viewing आज कुडाळ येथे सावंतवाडी संस्थान मराठा समाज स्नेहसंमेलन

आज कुडाळ येथे सावंतवाडी संस्थान मराठा समाज स्नेहसंमेलन

कुडाळ :

 

सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई या संस्थेचे २९ वे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम २० जानेवारी रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत कुडाळ येथील पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मारक मराठा समाज सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

या स्नेहसंमेलनाचे अध्यक्षपदी इंद्रजीत सावंत असून प्रमुख पाहुणे डॉ. बाळासाहेब सावंत, कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, प्रमुख वक्ते टाटा मोटर्स लिमिटेड डेप्युटी जनरल मॅनेजर(पुणे पिंपरी) सुशील वारंग, प्रमुख अतिथी डॉ. अजित राणे (केनिया) हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज शाळा सुधार पुरस्कार श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव (मालवण) प्रशालेश देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सीमा परब (राजमाता जिजाऊ पुरस्कार), शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते सतीशचंद्र बागवे (मराठा समाज गौरव पुरस्कार), अरविंद सरनोबत व संतोष गवस (दोन्ही आदर्श शिक्षक पुरस्कार), रामचंद्र शृंगारे (आयुर्वेदिक औषधी वनस्पती संकलन व संवर्धन), शर्वरी परब (महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात निवड), प्रकाशिका नाईक (भारतीय महिला क्रिकेट संघ सदस्य), श्रुतिका सावंत (आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियन), रोशन सावंत (एस ओसीसीए फुटबॉल वर्ल्डकप २०२३ साठी निवड), अथर्व जाधव (एनसीसी राष्ट्रीयस्तरावर निवड), चंद्रकांत काजरेकर (गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड वाइल्ड रेकॉर्ड होल्डर आंबा व काजू बागायतदार), राजाराम राऊळ (सेवानिवृत्ती बँक अधिकारी), दिपाली काजरेकर (चंद्रदीप काव्यसंग्रह), सुरेश परब सरंबळ (सेंद्रिय शेती), राजेंद्र मुळीक, गोविंद मुळीक (दोन्ही उद्योजक), तेजस सावंत (नेचर अँड वाइल्ड लाईफ प्रकल्पाची राज्यस्तरीय अविष्कारासाठी निवड, भाग्यश्री परब (पक्षी अभ्यासक) सिद्धी गावडे (फळप्रक्रिया उद्योग) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी कै. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज सभागृहात ११व्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळी तीर्थप्रसाद व भजने होणार आहेत. २१ रोजी दुपारी २.३० वाजता बालवाडी स्नेहसंमेलन होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी विश्वस्त सतीश सावंत व कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 8 =