You are currently viewing कराड येथे कार अपघातात सिंधुदुर्गातील चार कोतवाल ठार

कराड येथे कार अपघातात सिंधुदुर्गातील चार कोतवाल ठार

एका गंभीर जखमीवर तेथील रुग्णालयात उपचार सुरू

आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला भीषण अपघात

कणकवली

​कराड वहागाव येथे खाजगी कार्यक्रमासाठी गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार कोतवालांचा कार अपघातात जागीच मृत्यू झाला. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कराड वहागाव येथील रस्त्यावर हा अपघात घडला. हे पाच कोतवाल स्विफ्ट डिझायर कार घेऊन कराड येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना वाटेत हा अपघात घडला. यात स्विफ्ट डिझायर चार चाकी कारचा अक्षरशः चुरा झाला. हे पाच कोतवाल कराड येथील एका खाजगी कार्यक्रमासाठी गेले होते. यातील एक कोतवाल गंभीर असून त्याच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कणकवली तालुक्यातील एक, कुडाळचे तीन, व मालवण मधील एक असे एकूण पाच कोतवाल कराड येथे जात असताना हा भीषण अपघात घडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =