You are currently viewing ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजपच्यावतीने मोर्चेबांधणीस सुरुवात

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजपच्यावतीने मोर्चेबांधणीस सुरुवात

गोठोस-निळेली ग्रुप ग्रामपंचायत काबित करण्यासाठी प्रयत्न

कुडाळ
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोठोस-निळेली ग्रुप ग्रामपंचायत काबित करण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे पदाधिकारी पक्षबांधणीसाठी ग्रामपंचायतीवर सत्ताकाबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. काल रात्री गोठोस- निळेली ग्रूप ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी संदर्भात प्रकाश मोर्ये व जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष दिनेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली श्री‌.मोर्ये यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. निवडणुकीत सक्षम उमेदवार देऊन गोठोस-निळेली ग्रूप ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता सत्ताधाऱ्यांकडून काबीज करण्यासाठी सक्षम उमेदवार व युवा नेतृत्व यांना उमेदवारी देऊन ग्रामपंचायत काबीज करण्याची तयारी करा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी उमेदवारीबद्दल शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी विभागीय अध्यक्ष दिनेश शिंदे, प्रकाश मोर्ये यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवि राऊळ, प्रसाद मोर्ये, झिलू वर्क, दिपक खरात, आबा निचम, दिलीप राऊळ, भरत सावंत, बाळा सुद्रिक, हरी तेजम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + sixteen =