You are currently viewing नाईक कुटुंबियांकडून बांदा केंद्र शाळेसाठी साऊंड सिस्टीम भेट

नाईक कुटुंबियांकडून बांदा केंद्र शाळेसाठी साऊंड सिस्टीम भेट

बांदा

स्वर्गीय इंदिरा वासुदेव नाईक रा. बिबवणे यांच्या स्मरणार्थ सेवानिवृत्त प्राध्यापक एस.व्ही नाईक यांच्या कुटुंबीयांकडून जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेसाठी साऊंड सिस्टिम प्रदान करण्यात आला.
प्राध्यापक एस .व्ही. नाईक हे प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले असून बांदा केंद्र शाळेला आवश्यक असलेल्या साऊंड सिस्टीमची गरज ओळखून शाळेला आपल्या आईच्या स्मरणार्थ साउंड सिस्टीम उपलब्ध करून दिला. यापूर्वीही नाईक कुटुंबियांकडून बांदा केंद्र शाळेसाठी मुख्याध्यापक कार्यालयाला फरशीकरण व शोकस कपाट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
नाईक कुटुबियांच्या या दातृत्वाबददल प्राध्यापक एस. व्ही. नाईक व बांदा शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे.डी . पाटील यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, रंगनाथ परब, प्रशांत पवार, गोपाळ साबळे शिक्षक आदि उपस्थित होते.नाईक कुटुंबियांच्या या दातृत्वाबद्दल पालकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 1 =