You are currently viewing पुण्यात ‘कोहिनूर पु. ल. स्मृति महोत्सवा’ चे आयोजन

पुण्यात ‘कोहिनूर पु. ल. स्मृति महोत्सवा’ चे आयोजन

पुणे :

पु.ल.देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोहिनूर प्रस्तुत आणि अँड एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने आशय फिल्म व सांस्कृतिक क्लबतर्फे शनिवार 11 व रविवार 12 रोजी ‘कोहिनूर पु.ल.स्मृति महोत्सवा’ चे आयोजन केले आहे.या महोत्सवात रसिकांना दर्जेदार कार्यक्रमांची पर्वणी मिळणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणी सतीष जकातदार यांनी दिली. स.प.महाविद्यालयाच्या लेडी रामाबाई सभगृहात महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी होणार आहे.

स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात होणाऱ्या या महोत्सवाचे उद्‍घाटन शनिवारी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘पुलंचे संचित’ या विषयावर त्या विचार मांडणार आहेत. तसेच, चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक प्रकाश मगदूम यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘प्रिय भाई…एक कविता हवी होती’ हा कार्यक्रम सादर होणार आहेत. तर, ‘द्रष्टे पु. ल.’ या परिसंवादाने रविवारच्या सत्राची सुरुवात होणार असून त्यानंतर ‘या सम हा’ हा दुर्मिळ लघुपट दाखविण्यात येणार आहे. सर्वांसाठी विनामूल्य असलेल्या या महोत्सवाच्या प्रवेशिका शुक्रवारी स. प. महाविद्यालयाच्या मुख्य दारापाशी सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत उपलब्ध असतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =