You are currently viewing सिंधुदुर्ग रुग्णालयात अचानक स्पोट..

सिंधुदुर्ग रुग्णालयात अचानक स्पोट..

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा रुग्णालयात कोरोना वार्ड नजीक बसविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडर ची कॅप उडून अचानक मोठा स्पोट झाला. स्पोट च्या आवाजाने कर्मचाऱ्यांसह सर्वांचीच धावपळ उडाली. परंतु सुदैवाने कोणतीही नुकसानी अगर अनुचित प्रकार घडला नाही. सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालया मध्ये गंभीर रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून ठेवले जातात. त्यानुसार कोरोना वार्ड इमारती नजीक रुग्णालयातील रुग्णांच्या सोयीसाठी ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आले होते.

ऑक्सीजन प्लांट मध्ये एकत्र ठेवलेल्या एका ऑक्सिजन सिलेंडर ची कॅप उडून सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान अचानक स्पोट झाला. या स्पोट चा आवाज मोठा झाल्याने कर्मचारी आणि कोरोना वार्डात असलेले रुग्ण, आजूबाजूला असलेले करोना रुग्णांचे नातेवाईक यांची धावपळ उडाली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे कर्मचारी वर्गात भीती निर्माण झाली. परंतु संबंधित ऑक्सीजन प्लांट च्या यंत्रणेने तातडीने येऊन पाहणी केली असता कॅप उडून हा स्पोट झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र कोणतीही जिवीत हानी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कर्मचाऱ्यांमध्ये मात्र काही काळ भीतीचे वातावरण होते. स्फोटामुळे रुग्णाच्या नजीक असलेल्या कर्मचारी याची तारांबळ उडाली. परंतु कोणताही अनर्थ घडला नसल्याने सर्वांनी निश्वास सोडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =