You are currently viewing ३१ डिसेंबर नंतर चालक-वाहकांना मुंबईला पाठवल्यास उग्र आंदोलन करू

३१ डिसेंबर नंतर चालक-वाहकांना मुंबईला पाठवल्यास उग्र आंदोलन करू

– प्रसन्ना देसाई

वेंगुर्ला
आगार व्यवस्थापक यांना घेराओ घालून ग्रामीण भागातील एसटी वेळापत्रक बिघडवून पुन्हा ३१ डिसेंबर नंतर पुन्हा चालक व वाहक याना मुंबईला पाठविल्यास एसटी प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन करून आगार बंद करू असा इशारा आज भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी वेंगुर्ला आगार व्यवस्थापक ठोंबरे याना दिला आहे.
वेंगुर्ले भाजपच्या वतीने एसटी चालक व वाहक यांच्या विविध समस्यांबाबत आगार व्यवस्थापक याना घेराओ घालण्यात आला. तसेच विविध समस्यांबाबत जाब विचारण्यात आला. महाराष्ट्र प्रशासनाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सोयीकरीता सातत्याने ग्रामीण प्रवाश्यांवर अन्याय करून सिंधुदुर्ग आगारातील चालक व वाहक मुंबईला पाठविले. तसेच या चालक वाचकांची कोणतीही सोयीसुविधा पुरवली नाही. ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांना सुद्धा मुंबईत पाठवण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता. कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक असताना सुद्धा सेवा बजावून आल्यानंतर त्यांची वेळेवर तापसणी होत नाही. यामुळे कर्मचारी तणावाखाली आहे. शासनाने ३१ डिसेंबर पर्यंत ग्रामीण भागातील
वाहक व चालक मुंबईला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु जानेवारी मध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविणार असल्याचे समजते. जर ग्रामीण भागातील एसटी वेळापत्रक बिघडवून पुन्हा एकदा चालक व वाहक मुंबईला पाठवले तर एसटी प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापक ठोंबरे याना देण्यात आला. तसेच यावेळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणार त्रास लक्षात घेता
ग्रामीण भागातीलही एसटी सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , एस. टी. कामगार नेते प्रकाश रेगे , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, तुळस सरपंच शंकर घारे, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, किसान मोर्चा चे बाळु प्रभु, ता.चिटनीस समीर चिंदरकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, बुथप्रमुख – प्रकाश मोटे, शेखर काणेकर, विनय गोरे, युवा मोर्चा चे सोमकांत सावंत, सुजय गांवकर इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =