You are currently viewing तुळसुली ग्रामपंचायती मार्फत शेतकऱ्यांना सुफला खताचे मोफत वाटप

तुळसुली ग्रामपंचायती मार्फत शेतकऱ्यांना सुफला खताचे मोफत वाटप

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील तंटामुक्त गाव असलेल्या तुळसुली ग्रामपंचायती मार्फत येथील शेतकऱ्याना मोफत खत वाटत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला पाच किलो सुफला खताचे वाटप यावेळी करण्यात आले.

सध्या बाजारात खतांचा तुटवडा असून लगेच खत उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण समजून शेतकऱ्यांना खत उपलब्ध व्हावे यासाठी तुळसूली ग्रामपंचायतने हा स्तत्य उपक्रम राबविला आहे. गावातच खत उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच सौ सुचिता तुळसुलकर, उपसरपंच विजय वारंग आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =