You are currently viewing इन्सुली कालव्यात पाणी येईपर्यंत मूक आंदोलन करणार –  सोनाली मेस्त्री 

इन्सुली कालव्यात पाणी येईपर्यंत मूक आंदोलन करणार –  सोनाली मेस्त्री 

सिंधुदुर्ग पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना दिले निवेदन

बांदा

मार्च अखेर होत आली तरी अद्याप इन्सुली येथील तिलारी कालव्यात पाणी न पोहचल्याने इन्सुली वासियांमधून संताप व्यक्त होत आहे. गतवर्षी कालव्यात पाणी आले होते त्यामुळे इन्सुली ग्रामस्थांची पाण्याची गैरसोय टळली होती.

मात्र यंदा अद्याप पाणी न पोहचल्याने बागायती पाण्या अभावी सुकून जात आहे. 10 एप्रिल पर्यंत तिलारीचे पाणी इन्सुलीत न पोहचल्यास आपण शेतकऱ्यांसह घागर घेऊन इन्सुली कालव्यात पाणी येईपर्यंत मूक आंदोलन करणार असा इशारा इन्सुली ग्रामपंचायत सदस्या सौ. सोनाली संतोष मेस्त्री यांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी सिंधुदुर्ग पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना दिले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ मेस्त्री, सुषमा बोर्डेकर, संतोष मेस्त्री, संदीप बोर्डेकर व सौ नाईक उपस्थित होते. यावेळी सदरचे निवेदन पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अनिल मोहिते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + nineteen =