You are currently viewing ट्रिपलसीट व विनापरवाना दुचाकी चालवणारे शाळा-कॉलेज मधील युवक युवती मालवण पोलिसांच्या रडारावर

ट्रिपलसीट व विनापरवाना दुचाकी चालवणारे शाळा-कॉलेज मधील युवक युवती मालवण पोलिसांच्या रडारावर

मालवण

कर्णकर्कश बुलेट चालकांवर मालवण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारात अनेकांवर कारवाई केली. त्या सोबतच फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी व ट्रिपलसीट चालकांवरही धडक कारवाई मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब व अमित हरमलकर यांच्या माध्यमातून ही कारवाई मोहीम सुरू आहे.

तरी दुचाकीच्या नंबरप्लेट फॅन्सी स्वरूपात असतील तर त्या बदलून नियमानुसार नंबरप्लेट असाव्यात. तसेच शाळा कॉलेज विद्यार्थी यांना लायसन्स नसताना कोणीही त्यांच्याकडे दुचाकी देऊ नये. पालकांनीही याबाबत काळजी घ्यावी. तसेच भरधाव वेगात ट्रिपलसीट दुचाकी चालकांवरही नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी नियमांचे पालन सर्वांनी करावे. असे आवाहन मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + fourteen =