You are currently viewing मुंबईस्थित ओटवणे ग्रामस्थ मंडळाचा गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

मुंबईस्थित ओटवणे ग्रामस्थ मंडळाचा गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

ओटवणे

तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी घरात शिरून नुकसान झालेल्या ओटवणे गावातील पाच पूरग्रस्तांना ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी विठोबा न्हानू वरेकर, सुरेश न्हानू वरेकर, रविंद्र मारुती कुडाळकर, सावित्री चंद्रकांत रेडकर, रमाकांत रामचंद्र कविटकर या पाच पूरग्रस्तांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी पूरग्रस्तांनी मुंबई मंडळाचे आभार मानले. दरम्यान गेल्या वर्षीही मुंबई मंडळामार्फत देऊळवाडी येथील रामदास व जिजी गावकर याना मदत देण्यात आली होती. यावेळी ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे सरचिटणीस रामचंद्र गावकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, मंडळाचे माजी खजिनदार दशरथ गावकर, ओटवणे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संजीवनी गवस, गावठणवाडी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा गावकर, गणपत बिरोडकर, मंगेश गावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − three =