You are currently viewing ०१ मे रोजी नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी काव्यजागर संमेलन

०१ मे रोजी नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी काव्यजागर संमेलन

*०१ मे रोजी नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी काव्यजागर संमेलन*

पिंपरी

पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने सोमवार, दिनांक ०१ मे २०२३ रोजी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी अर्थातच स्वानंद सोसायटी, रुपा रेसिडेन्सीसमोर, श्रावणी सृष्टीजवळ, गंगानगर, नेरळ (पश्चिम), तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सासवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे हे उद्घाटक असून पिंपरी येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कष्टकरी संघर्ष महासंघ – महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या संमेलनात प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आणि महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम (पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान), कविवर्य अरुण म्हात्रे (कवी केशवसुत स्नेहबंध पुरस्कार), रजनी उद्धव कानडे (मास्तरांची सावली कृष्णाबाई सुर्वे सन्मान), डॉ. अभिजित पाटील आणि नंदकुमार मुरडे यांना अनुक्रमे नारायण सुर्वे काव्यप्रतिभा आणि शब्दप्रतिभा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागनाथ पाटील (नांदेड), मनीषा पाटील (सांगली), डॉ. कैलास दौंड (पाथर्डी), खेमराज भोयर (चंद्रपूर), अस्मिता चांदणे (पुणे), प्रवीण पवार (धुळे) यांच्या साहित्यकृतींना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून नारायण सुर्वे यांचे वारसदार कवी म्हणून श्रीनिवास मस्के, वसंत पाटील, भरत बारी, आत्माराम हारे आणि प्रभाकर वाघोले आपल्या कवितांचे सादरीकरण करतील.

विनाशुल्क असलेल्या या संमेलनाचा लाभ सर्व साहित्यरसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी केले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

 

*संवाद मीडिया*

*🎊सुवर्णसंधी..!!🎊सुवर्णसंधी..!!🎊 सुवर्णसंधी..!!🎊*

*🪙अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर🥳 हक्काचे घर खरेदी🏡 करणार्‍या ग्राहकांना👥सुवर्णसंधी…!!🎊*

*🛣️कुडाळ येथील प्रसिध्द छत्रपती शिवाजी पार्क🌆 मध्ये फ्लॅट🏢 बूक करा🏷️आणि मिळवा 🤗तब्बल 2️⃣ लाखाच्या वस्तू🛍️*

*_🛣️कुडाळ शहराच्या🌆 मध्यभागी सर्व सुविधांनी 🤗युक्त फ्लॅट 🏢घेण्याचे स्वप्न पुर्ण करा..!!🤩_*

*🔸३२ इंची एलईडी टीव्ही🖥️*
*🔹विंडो एसी सी वन टन🥶*
*🔸सिंगल डोर फ्रीज🚪*
*🔹टीव्ही युनिट📺*
*🔸फाईव्ह सीटर सोपासेट🛋️*
*🔹थ्री डोर कपबोर्ड👚*
*🔸क्वीन साईज बेड🛏️*
*🔹क्वीन साइज मॅट्रेस विथ पिलो🧽*
*🔸 सेंटर टेबल🪑*
*🔹शु रॅक👟*
*🔸फोटो फ्रेम 5 qty🖼️*

*_👉…आणि बरंच काही…!!🥳_*

*🛑विशेष टिप:- हि ऑफर फक्त अक्षयतृतीये दिवशीच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे..!!_*

*🎴आमचा पत्ता-:*
*छत्रपती शिवाजी पार्क*
*_सत्कार हॉटेल रोड, जुना बसस्टॉप समोर, कुडाळ_*

*📲संपर्क:-*
*७०३८२८१२३४ / ९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१ / ९४०४७५१५००*

*जाहिरात लिंक*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा