You are currently viewing राष्ट्रव्यापी “स्वच्छता हि सेवा” मोहिमेत जिल्हावासियांनी सक्रिय सहभाग घ्यावा

राष्ट्रव्यापी “स्वच्छता हि सेवा” मोहिमेत जिल्हावासियांनी सक्रिय सहभाग घ्यावा

 उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील 741 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दिनांक 15 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत “स्वच्छता हि सेवा” राष्ट्रव्यापी मोहिम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेत जिल्हावासियांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनूसार दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत “स्वच्छता हि सेवा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दृष्यमान स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करणे, गावातील कचराकुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करणे, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी ओला कचरा व सुका कचरा वर्गिकरण करण्याबाबत जनजागृती करणे, कचरा संकलन आणी विलगीकरण करण्यांसाठी केंद्र निर्माण करणे, प्लॅस्टीकसारखा अविघटनशील कचरा एकत्रीत करुन नियोजन करणे, गावातील पाणवठ्याजवळील परीसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवती वृक्षारोपण करणे, एकल प्लॅस्टीक (Single use plastic) वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभा आयोजित करून यापूर्वी प्लॅस्टीक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. हागणदारीमुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे. कचरा न करणे बाबत घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करणे तसेच प्रतिज्ञा घेणे, प्लॅस्टीक बंदी व स्वच्छता या विषयावर वक्तृत्व,निबंध,रांगोळी,सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन या “स्वच्छता हि सेवा” या मोहिमे दरम्यान करण्यात येणार आहे. या मध्ये सर्व जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =