कणकवली पं स च्या नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात

कणकवली पं स च्या नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात

कणकवली

कणकवली पं स च्या नूतन प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून लॉकडाऊन नंतर 15 मे नंतर लवकरच या इमारतीचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. कणकवली पं स च्या सभापतीपदी विराजमान होताच सभापती मनोज रावराणे यांनी या इमारतीच्या प्लम्बिंग आणि इलेक्ट्रिक कामाची प्रशासकीय मान्यता कोकण आयुक्त पातळीवरून मंजूर करून आणली होती.त्यानंतर सुमारे दीड कोटी निधी खर्चून बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या प्लम्बिंग आणि इलेक्ट्रिक कामाच्या जोडणीच्या कामाने वेग घेतला.सध्यस्थीतीत इमारतीचे प्लम्बिंग व इलेक्ट्रिक वर्क पूर्ण झाले आहे. विजजोडणीसाठी आवश्यक ट्रान्सफर लवकरच बसविण्यात येणार असून इमारतीच्या सभोवताली सुशोभीकरण आणि कंपाउंड वॉल बांधून पूर्ण झाली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते तत्कालीन सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या कार्यकाळात या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या कार्यकाळात इमारत बांधकाम पूर्ण करण्यात आले होते.लवकरच या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा