You are currently viewing देवगड तालुक्यात पोलवरील तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन वृद्धाचा मृत्यू

देवगड तालुक्यात पोलवरील तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन वृद्धाचा मृत्यू

देवगड

दीनानाथ वसंत गायकवाड (वय 68 वर्षे)रा. बापर्डे गायकवाड वाडी यांच्या पोल वरून तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे ही घटना 07 सप्टेंबर रोजी दुपारी 03.15 वा. ते रात्रौ 09.00 च्या मानाने हेळ्याची भाटी येथे व्हळाच्या किनारी असलेल्या इलेक्ट्रिक पोल नजीक घडली आहे पोलीस स्टेशनला त्यांचा मुलगा श्रीकांत याने 8 सप्टेंबर रोजी खबर दिली आहे

दीनानाथ गायकवाड हे दळण घेऊन जात असताना पायवाटेवरील वाढलेल्या गवतात इलेक्ट्रिक पोल वरील तुटलेल्या तारेचा स्पर्श त्यांना लागून शॉक लागून मयत झाले देवगड पोलीस पुढील तपास करत आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा